पाचोरा कृष्णापुरी वि.का. सहकारी सोसायटीची शंभर टक्के कर्जवसुली; परंपरा यंदाही कायम


राजेंद्र खैरनार(मुख्य संपादक) सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी):पाचोरा येथील पाचोरा कृष्णापुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने सन 2025-2026 या आर्थिक वर्षात मार्च महिन्यापूर्वीच बँक कर्जाची 100 टक्के वसुली करून उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली शंभर टक्के कर्जवसुलीची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात संस्थेला यश आले आहे.
संस्थेचे कार्य गेल्या 28 वर्षांपासून सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेने दरवर्षी मुदतीत बँक कर्जाची परतफेड करून आदर्श निर्माण केला आहे.
सभासदांशी सातत्याने संपर्क साधत, शून्य टक्के व्याजासह संस्थेकडून अतिरिक्त 2 टक्के व्याज सवलत (रिबेट) देण्याचा महत्वाचा निर्णय संस्थेने घेतला. या प्रोत्साहनपर उपक्रमामुळे सभासदांमध्ये वेळेवर कर्जफेड करण्याबाबत जागरूकता वाढली आणि सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले कर्ज नियमितपणे फेडले. परिणामी, संस्थेला बँकेचे कर्ज पूर्णपणे परतफेड करता आले.
या यशामध्ये संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश प्रभाकर पाटील, उपाध्यक्ष शिवाजी अर्जुन चौधरी तसेच संचालक मंडळातील शिवाजी महाजन, सिंधुताई शिंदे, धोंडू हटकर, प्रकाश चौधरी, दिगंबर अहिरे, दिलीप नागणे, काशिनाथ पाटील, मुक्ताबाई बोरसे, प्रेमलाल देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच, संस्थेचे सचिव नारायण चौधरी, लिपिक मयूर चौधरी, जिल्हा बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक प्रमोद पाटील, बँक इन्स्पेक्टर मनोज पाटील आणि शाखा व्यवस्थापक बाविस्कर मॅडम यांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे ही यशस्वी कर्जवसुली साध्य झाली.
सहकार क्षेत्रात आदर्श ठरणारी ही कामगिरी असून, इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद