"प्रशासकीय व्यस्ततेतूनही मानवतेचा ध्यास — तहसिलदार बनसोडे साहेबांचे कानबाई मातेच्या दर्शनाला उपस्थिती”

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

पाचोरा (प्रतिनिधी)
दि. २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी, पाचोरा तालुक्याचे मा. तहसिलदार श्री. विजयजी बनसोडे साहेब यांनी आपल्या प्रशासकीय व्यस्त कामातून वेळ काढत एका गरीब कुटुंबाच्या निमंत्रणाला मान देत तारखेडा बु. येथे कानबाई मातेच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली. त्यांच्या या साधेपणातून आणि संवेदनशीलतेतून समाजातील सर्व स्तरांशी जपलेला स्नेहभाव अधोरेखित झाला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल आबा येवले, तसेच पत्रकार श्री. राजेंद्र खैरनार यांनीही उपस्थित राहून कानबाई मातेचे दर्शन घेतले.
मा. तहसिलदार साहेब हे आपल्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या व्यापातही धार्मिकतेला आणि मानवी मूल्यांना तेवढेच महत्त्व देतात. सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध जपणे ही त्यांची कार्यशैली विशेष उल्लेखनीय आहे. तसेच कोणत्याही कामाच्या बाबतीत ते कायदेशीर प्रक्रियेला प्राधान्य देत, प्रत्येक काम नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडले जाईल यासाठी कटिबद्ध असतात. एक जबाबदार अधिकारी म्हणून ते सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडूनही शिस्तबद्ध आणि योग्य पद्धतीने काम करून घेतात.
प्रशासकीय कामानिमित्त प्रवास करताना देखील त्यांची संवेदनशीलता जाणवते. वाहन चालकाला “वाहनाच्या चाकाखाली एकही जीवाला इजा पोहोचू नये,” अशी सतत सूचना देत, शक्यतो प्रत्येक जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा, असा मानवतावादी दृष्टिकोन ते जपतात. माळकरी वृत्तीमुळे त्यांच्या मनात सर्व सजीवांप्रती करुणा आणि जिव्हाळा आहे, हे त्यांच्या वागणुकीतून प्रकर्षाने दिसून येते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..