पाचोरा बसस्टॅण्डवर धुमाकूळ घालणारी चोरीची टोळी जेरबंद; पाचोरा गुन्हे शाखेची दमदार कारवाई


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल 
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा बसस्थानक परिसरात नागरिकांना लक्ष्य करत धाडसी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने अखेर जेरबंद करत प्रभावी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींसह एका विधीसंघर्ष बालकाचा या कारवाईत समावेश असून, पोलिसांनी पुन्हा एकदा सतर्कतेचा ठसा उमटवला आहे.
जळगाव जिल्ह्यात बसस्टॅण्ड परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी कडक सूचना देत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने वेगाने तपास सुरू केला.
दिनांक 24 मार्च 2026 रोजी सुभाष विठ्ठल भावसार (वय 70, रा. उप्पलखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) हे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरी विक्री करून मिळालेली 50 हजार रुपयांची रक्कम घेऊन बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा रचत आरोपी अंकुश मधुकर सुरवाडे (वय 19, रा. गेंदालाल मिल, जळगाव) यास अटक केली. विशेष म्हणजे सदर आरोपी हा मु.पो.का.क-56 नुसार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला असूनही चोरीच्या उद्देशाने पाचोऱ्यात दाखल झाला होता. त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्ष बालकालाही ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींकडून कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. या टोळीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी योगेश पाटील, संदीप राजपूत, हरीश परदेशी, गणेश कुवर तसेच होमगार्ड पंकज सोनवणे व अमोल गायकवाड यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ राहुल शिंपी करत असून, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..