वनस्पती निसर्ग व मानव यांच्यात समन्वय साधते -प्रा. जे बी पाटील यांचे प्रतिपादन.

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
कोळगाव - वनस्पती या मानवास उपयुक्त असून ऑक्सिजन सावली, अन्न ,वस्त्र व  निवारा  या मूलभूत गरजा सदैव पूरवत असतात  तसेच ऑक्सिजन,सावली व इतर अनेक गरजा भागवत मानवी जीवन सुखकर करण्याचा सदैव प्रयत्न करतात.परंतु हल्ली मानव मोठ मोठया वृक्षाची तोड करून पर्यावरणास हानी पोहोचवत आहेत .वृक्ष सदैव मानवास उपयुक्त असून दरवर्षी वृक्षरोपण करतो परंतु योग्य ती काळजी घेऊन संगोपन करत नाही म्हणून उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागतात.जागतिक तापमान वाढीचा परिणाम भोगतोय तसेच कमी पर्ज्यन्यमान व पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे म्हणून मानवाने जास्तीत जास्त वृक्षारोपण  करावे व संवर्धन केले पाहिजे तर पुढच्या पिढीसाठी फायदेशीर ठरेल"असे मार्गदर्शन पर विचार वनस्पतीशास्त्राचे   प्रा जे. बी. पाटील, राणी लक्ष्मीबाई  महाविद्यालय पारोळा यांनी मांडले ते येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कोळगाव येथे वनस्पती शास्त्र विभागातर्फे "पर्यावरणाचा निसर्गा वरील परिणाम" या विषयी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोळी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे नियतकालिक "किसान "  देऊन अतिथींचा सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुनीता पाटील यांनी केले‌. सूत्रसंचालन प्रा. प्रविणा पाटील यांनी तर आभार प्रा. तुषार पाटील यांनी मानले. सदर प्रसंगी तेजस पवार, चेतन पाटील, सनी पाटील उपस्थित होते‌.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..