ज्ञान, संस्कार आणि आधुनिकतेचा संगम : पाचोऱ्यात ‘ज्ञानोत्सव 2026’चे आयोजन



राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

पाचोरा-भडगाव परिसरात शिक्षण क्षेत्रात नवे पर्व उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून नर्मदा इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा तर्फे “ज्ञानोत्सव 2026 (Knowledge Festival)” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अंतुर्ली फाटा जवळ, भडगाव रोड येथे हा प्रेरणादायी समारंभ पार पडणार आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सर्वांगीण विकासाची जाणीव निर्माण होणे अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला ‘ज्ञानोत्सव’ हा उपक्रम शिक्षणाला नवे दिशा देणारा ठरणार आहे. ज्ञानसाधना, भारतीय संस्कृती व आधुनिक शिक्षणपद्धती यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक स्तुत्य प्रयत्न मानला जात आहे.
या कार्यक्रमास पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. ‘ज्ञानोत्सव 2026’ हा केवळ एक कार्यक्रम नसून, तो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा आणि समाजात शैक्षणिक जागर निर्माण करणारा एक प्रभावी मंच ठरणार आहे.
या उपक्रमाला पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षणाच्या या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद