शिक्षण क्षेत्रात नवा मापदंड! पाचोर्यात ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा ज्ञानोत्सव २०२६; अत्याधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षणाची हमी


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, या ध्येयाने कार्यरत असलेल्या किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित नर्मदा इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई. प्रस्तावित), पाचोरा यांच्या वतीने ‘ज्ञानोत्सव – नॉलेज फेस्टिव्हल २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ प्रवेश प्रक्रियेपुरता मर्यादित नसून, शिक्षणातील नवे तंत्रज्ञान, मूल्याधारित शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया घालणारा ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलक्षणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. भाईजी राधेश्यामजी चांडक उपस्थित राहणार आहेत. तसेच पाचोरा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोर पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गणेश शिंदे मार्गदर्शन करणार असून, कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार श्री. किशोर आप्पा पाटील आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. संजय पाटील (मुंबई), श्री. सुमित किशोर पाटील (गटनेता तथा नगरसेवक, पाचोरा) तसेच डॉ. प्रियंका पियुष पाटील (संचालक, स्वॉयन क्लिनीक, पुणे) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे शैक्षणिक नेतृत्व प्राचार्या श्रीमती राधिका सतीश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
दिनांक २२ मार्च २०२६ (रविवार) रोजी सायंकाळी ५ वाजता भडगाव रोडवरील अंतुर्ली फाटा परिसरात हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये नर्सरी ते ७ वी पर्यंत CBSE अभ्यासक्रम, कृतीयुक्त अध्यापन, स्मार्ट डिजिटल वर्गखोल्या, AI व कोडिंग लॅब, रोबोटिक्स लॅब, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी अशा आधुनिक सुविधांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, संस्कार, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षित, स्वच्छ वातावरणावर विशेष भर दिला जाणार आहे.
याशिवाय वातानुकूलित वर्गखोल्या, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड, भव्य खेळाचे मैदान, तसेच सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित कॅम्पस अशा जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ साठी सुरू झाली असून मर्यादित जागांमुळे पालकांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक पालकांनी
📞 9044183111 / 9044184111
या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद