पाचोरा तहसिलदार बनसोडे कुटुंबाचा दुहेरी आनंदोत्सव; लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था,पाचोरा येथे अनाथ विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल 
पाचोरा, दि. २८ मार्च २०२६ – पाचोरा तालुक्याचे तहसिलदार मा. श्री. विजयजी बनसोडे साहेब यांच्या कन्या कु. तेजू हिचा १३ वा वाढदिवस आज लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था, पाचोरा येथे अनाथ विद्यार्थ्यांसोबत अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. “हरी विठ्ठल”च्या जयघोषात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच सर्व विद्यार्थ्यांना रुचकर असे भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी तहसिलदार कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये महेंद्र पाटील, आर. डी. पाटील, राहुल पवार (पुरवठा निरीक्षक), महादेव फड भाऊसाहेब, योगेश व्यास, तातेराव सपकाळ, नकुल काळकर, अमोल शिंदे, निखिल बळी, लोकराम हिंगे, ललित पुजारी, विश्वेश आदी कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य केले. बनसोडे साहेबांचा संपूर्ण स्टाफ यावेळी एकत्र सहभागी झाल्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
तसेच आदरणीय रमेशजी भाऊ मोर यांच्यासह ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर यांनीही उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
याच दिवशी बनसोडे साहेब व सौ. बनसोडे ताईसाहेब यांच्या सहजीवनाला १६ वर्षे पूर्ण झाल्याने “दुग्धशर्करा योग” साधला गेला. या आनंददायी क्षणी उपस्थित सर्वांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी तहसिलदार बनसोडे साहेबांनी केवळ आनंद साजरा न करता सामाजिक जबाबदारीची जाणीवही कृतीतून दाखवून दिली. अनाथ मुलांच्या कल्याणासाठी पुढाकार घेत त्यांनी पुरवठा अधिकारी श्री. राहुल पवार यांना शासकीय योजनांमधून धान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच एकल बाल संगोपन योजना अंतर्गत या विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे उपस्थितांच्या मनात आदराची भावना अधिक दृढ झाली.
कार्यक्रमादरम्यान अनाथ विद्यार्थ्यांप्रती असलेली सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली. बनसोडे कुटुंबाने आपल्या वैयक्तिक आनंदात समाजातील वंचित घटकांना सहभागी करून घेत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस आणि विवाह वर्धापन दिन पाचोरा शहरासाठी एक आदर्शवत उपक्रम ठरला असून, “आपला आनंद समाजासोबत वाटला तरच तो खऱ्या अर्थाने मोठा होतो,” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे दिला गेला.
यावेळी उपस्थित मान्यवर, कर्मचारी तसेच जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल आबा येवले आणि सत्य शोध न्यूजचे श्री राजेंद्र खैरनार आदी पत्रकारांनी या उपक्रमाचे कौतुक करत बनसोडे कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..