नंदुरबारच्या मातीतून उमलतोय चिमुकला क्रीडातारा : चि. ध्येय वीरल मेहताची क्रीडाक्षेत्राकडे वाटचाल


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
नंदुरबार शहरातील पीजी प्ले स्कूल नंदुरबार येथील विद्यार्थी चि.धैर्य वीरल मेहता हा आपल्या लहान वयातच क्रीडाप्रेम आणि उत्साही स्वभावामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या सातव्या वर्षीच खेळांविषयी असलेली त्याची ओढ आणि मैदानावर दिसणारी चपळता पाहून शिक्षक, पालक आणि मित्रमंडळी त्याचे कौतुक करत आहेत.
फुटबॉल, क्रिकेट, रनिंग आणि सायकलिंग अशा विविध खेळांमध्ये ध्येयला विशेष रस आहे. शाळेत किंवा मोकळ्या वेळेत तो नेहमी मैदानावर खेळताना दिसतो. प्रत्येक खेळात सहभागी होत आपली क्षमता सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. खेळताना दिसणारी त्याची जिद्द, वेग आणि उत्साह यामुळे तो इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
शाळेत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये ध्येय नियमितपणे सहभागी होतो. या स्पर्धांमध्ये तो उत्तम कामगिरी करत अनेकदा क्रमांक मिळवत असल्याने शिक्षक आणि पालकांकडून त्याचे विशेष कौतुक केले जात आहे. लहान वयातच खेळांविषयी असलेली त्याची चिकाटी आणि सरावाची तयारी भविष्यातील यशाची चिन्हे मानली जात आहेत.
खेळ हे केवळ मनोरंजन नसून शरीर आणि मन दोन्ही मजबूत करण्याचे प्रभावी माध्यम आहे. ध्येयने लहान वयातच खेळांशी मैत्री केली असून त्याच्या या क्रीडाप्रेमामुळे तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याबरोबरच आत्मविश्वासानेही भरलेला दिसतो.
“बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” या म्हणीप्रमाणे ध्येयच्या लहान वयातच दिसणारी मेहनत, जिद्द आणि खेळावरील प्रेम भविष्यात त्याला क्रीडा क्षेत्रात मोठे यश मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. योग्य मार्गदर्शन, सतत सराव आणि पालक-शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाल्यास ध्येय भविष्यात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..