चेट्रीचंद्र व गुढीपाडवा निमित्त पाचोर्‍यात रक्तदानाचा सामाजिक उपक्रम; २० मार्च रोजी झुलेलाल मंदिरात भव्य रक्तदान शिबिर


राजेंद्र खैरनार – मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
सिंधी समाजाचे ईष्टदेव भगवान झुलेलाल यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा चेट्रीचंद्र तसेच हिंदू नववर्ष गुढीपाडवा या दुहेरी पर्वाचे औचित्य साधत पुज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत असून अनेक गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः थॅलेसेमिया सारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासत असल्यामुळे अशा रक्तदान शिबिरांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजोपयोगी कार्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
हे रक्तदान शिबिर दि. २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाचोरा येथील झुलेलाल मंदिर, सिंधी कॉलनी येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी रेड क्रॉस ब्लड बँक, जळगाव यांचे सहकार्य लाभणार असून रक्त संकलनाची संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या वैद्यकीय पथकाद्वारे पार पाडली जाणार आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व श्री. रवी सोनार व त्यांचा सहकारी गट करीत असून पाचोरा शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जात असल्याने या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..