पाचोरा येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न

राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
पाचोरा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने ग्राहक पंचायत महाराष्ट्र दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम पाचोरा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार विनोद कुमावत होते.
ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तालुकाध्यक्ष शांताराम चौधरी यांनी आपल्या भाषणात ग्राहक चळवळीचे जनक ग्राहक तीर्थ श्री. बिंदू माधव जोशी यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक चळवळीने घेतलेली गती, तिची ध्येय-धोरणे यावर प्रकाश टाकला.
पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी ग्राहकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी सजग व जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. फसवणूक टाळण्यासाठी वस्तूवरील एक्सपायरी डेट तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राहक पंचायत महाराष्ट्राची दिनदर्शिका आकर्षक व दर्जेदार असल्याचे सांगितले. या दिनदर्शिकेत वर्षभरातील धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी तसेच राष्ट्रीय पुरुषांचे प्रेरणादायी विचार उत्कृष्टरीत्या समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विनायक दिवटे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव मनोहर काटे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. वैशाली बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल येवले यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..