पाचोऱ्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फिजिओथेरपी शिबिर; ४५ विद्यार्थ्यांना थेरपी, पालकांना मार्गदर्शन समावेशक शिक्षण उपक्रमाला बळ – विशेष शिक्षकांच्या नियोजनातून यशस्वी आयोजन

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेले फिजिओथेरपी शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले. दिनांक २३ मार्च २०२६ रोजी गट साधन केंद्र, शिक्षण विभाग, पंचायत समिती पाचोरा यांच्या समावेशक शिक्षण उपक्रमांतर्गत हे शिबिर पार पडले.
सदर शिबिराचे आयोजन डॉ. चेतन पाटील यांच्या हेल्थ पॉईंट फिजिओथेरपी धन्वंतरी क्लिनिक अँड रिहॅब सेंटर, पाचोरा येथे करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. चेतन पाटील, डॉ. राहुल पाटील व त्यांची टीम, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे ४५ दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी सेवा देण्यात आली, तसेच पालकांना थेरपी पद्धती, वर्तन समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे सुयोग्य नियोजन केंद्रस्तरीय विशेष शिक्षक टीमने केले. उद्घाटनप्रसंगी लहू पवार यांनी प्रास्ताविक मांडले. चहा-नाश्त्याची व्यवस्था तसेच बैठक, नोंदणी व इतर कामकाज विशेष शिक्षकांनी काटेकोरपणे पार पाडले.
कार्यक्रमाच्या शेवटी सिमा पाटील यांनी मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. विशेष शिक्षकांच्या एकजुटीने व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे हे शिबिर यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
समावेशक शिक्षणाच्या दृष्टीने असे उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा देणारे ठरत असून, पाचोरा तालुक्यात या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..