वडगाव पान ऍसिड हल्ला : संतप्त सोनार समाज रस्त्यावर, आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची जोरदार मागणी

राजेंद्र खैरनार (मुख्य संपादक) – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : संगमनेर तालुका मधील वडगाव पान येथे सोनार समाजातील एका तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला असून, या अमानुष घटनेविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, तसेच पीडितेला लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी पाचोरा येथील सोनार समाजाने केली आहे.
या पार्श्वभूमीवर पाचोरा येथील अहिर सुवर्णकार मंडळ, अहिर सुवर्णकार महिला मंडळ, अहिर सुवर्णकार नवयुवक मंडळ आणि सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत निवेदन सादर केले.
हे निवेदन पाचोरा येथील तहसीलदार श्री विजय बनसोडे तसेच पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित मुलीच्या उपचार व न्यायप्रक्रियेसाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे समाजात तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस व तातडीची पावले उचलण्याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..