कोळगाव महाविद्यालयात 'शहीद दिन' उत्साहात साजरा

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
कोळगाव (ता. भडगाव): कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय आणि गो. पू. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथे २३ मार्च 'शहीद दिन' अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. नानासाहेब प्रतापराव पाटील आणि सचिव श्रीमती पूनमताई पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.
 प्राचार्य सुरेश कोळी यांनी आपल्या मार्गदर्शनात शहीद दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचा वारसा जपण्याचे आवाहन केले.आदर्श शेतकरी रावसाहेब प्रवीण पाटील यांनीही या प्रसंगी शहिदांच्या स्मृतींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचा लन प्रा. प्रशांत पाटील यांनी प्रभावी पणे केले, तर उपस्थि तांचे आभार प्रा. मनोज पवार यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीकार कांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..