पाचोरा न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय; महिला छेडछाड प्रकरणात आरोपी दोषी, शिक्षा ठोठावली

राजेंद्र खैरनार(मुख्य संपादक) सत्य शोध न्युज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी) – महिलांच्या सन्मानाशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयाची ठाम भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक 204/2023 मध्ये मा. न्यायालय, पाचोरा येथील मा. जी. एस. बोरा मॅडम यांच्या न्यायासनाने आरोपीला दोषी ठरवत स्पष्ट संदेश दिला आहे.
या प्रकरणात फिर्यादी सुभाष तुकाराम सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी बिस्मिल्ला इमाम मुसलमान याच्यावर भारतीय दंड विधान कलम 354(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणाची सुनावणी RCC क्रमांक 178/2025 अंतर्गत पार पडली.
दि. 31 मार्च 2026 रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने CRPC कलम 248(2) नुसार आरोपीस दोषी ठरवले. तसेच आरोपीला फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून 25,000 रुपये, 1,000 रुपये दंड आणि “कोर्ट उठेपर्यंत” साधी शिक्षा सुनावण्यात आली.
या खटल्यात एकूण 7 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. तपास अधिकारी म्हणून PSI अमोल पवार यांनी काम पाहिले, तर सरकारी अभियोक्ता श्री पी. बी. भावसार यांनी प्रभावी बाजू मांडली.
मा. SDPO बापू रोहम (पाचोरा विभाग) तसेच पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या सपोनि कल्याणी वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तपास आणि पैरवी पार पडली. पैरवी अधिकारी म्हणून HC 1234 राजेंद्र पाटील आणि केस वॉच पो.ना. 1281 दिपक पाटील यांनीही मोलाचे योगदान दिले.
महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात अशा प्रकारचे ठोस निकाल समाजात कायद्याचा धाक निर्माण करणारे ठरत आहेत

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..