जि. प. प्राथमिक शाळा, नाचणखेडा येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न


✍️ राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
नाचणखेडा (ता. पाचोरा) प्रतिनिधी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाचणखेडा येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार, नाटिका, देशभक्तीपर गीते, समूहगायन तसेच मनोरंजक सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
मुख्य अतिथी म्हणून
▪ श्री. किशोर आप्पा पाटील (आमदार, पाचोरा)
▪ सौ. वैशाली ताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी (चेअरमन, निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा)
प्रमुख अतिथी म्हणून
▪ श्री. रावसाहेब जिभाऊ पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य)
▪ श्री. मधुकरभाऊ पाटील काटे (माजी जिल्हा परिषद सदस्य)
▪ श्री. सुभाषभाऊ पाटील (माजी पंचायत समिती सभापती)
▪ श्री. शितलदादा सोमवंशी (माजी नगरसेवक)
विशेष अतिथी म्हणून
▪ श्री. विजय पवार (गट शिक्षण अधिकारी, पाचोरा)
▪ श्री. समाधान पाटील (शिक्षण विस्तार अधिकारी)
▪ श्री. सरोज गायकवाड (शिक्षण विस्तार अधिकारी)
▪ श्री. अनिल पाटील (केंद्रप्रमुख, बाळद)
▪ श्री. योगेशभाऊ बि-हाडे (अध्यक्ष, शिक्षण समिती)
▪ बाळद केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद
कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया :
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक करत अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व आत्मविश्वास वाढतो असे मत व्यक्त केले. पालक व ग्रामस्थांनी देखील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर समाधान व्यक्त केले.
यशस्वी आयोजन :
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक श्री. संजू राठोड व शिक्षक वृंद जि. प. प्राथमिक शाळा, नाचणखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, युवा वर्ग तसेच रामतीर बाबा वही मंडळ नाचणखेडा यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..