दिव्यांगांच्या ५% निधीवर पडदा का? ग्रामपंचायतीकडून लेखाजोखा जाहीर करा – प्रहार संघटनेची ठाम मागणी

 
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल

बांबरुड (राणीचे) प्रतिनिधी | दिनांक : २० फेब्रुवारी २०२६
बांबरुड (राणीचे) गावातील दिव्यांग बांधवांसाठी शासन नियमानुसार राखीव असलेला ५ टक्के निधी तात्काळ वितरित करण्यात यावा तसेच सन २०२० ते २०२५ या कालावधीतील निधीचा सविस्तर लेखाजोखा सार्वजनिक करावा, अशी ठाम मागणी प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात ग्रामपंचायतीला निवेदन देताना जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष रवीभाऊ पाटील, पारोळा अध्यक्ष पंकज सोनार, कुरंगी अध्यक्ष विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग हक्क कायद्याची आठवण
Rights of Persons with Disabilities Act, 2016 नुसार दिव्यांग व्यक्तींना समान संधी, संरक्षण व सक्षमीकरण देणे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर बंधनकारक आहे. मात्र स्थानिक पातळीवर दिव्यांगांसाठी आवश्यक साधने, आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा व पुनर्वसनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याची गंभीर बाब संघटनेने निवेदनातून निदर्शनास आणून दिली आहे.
प्रहार संघटनेच्या प्रमुख मागण्या
🔹 दिव्यांगांसाठी राखीव ५% निधी तात्काळ वितरित करावा.
🔹 प्रलंबित अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांना त्वरित मदत द्यावी.
🔹 निधी वितरणाची माहिती ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिकरित्या जाहीर करावी.
🔹 सन २०२० ते २०२५ या कालावधीत किती निधी वितरित झाला याचा सविस्तर लेखाजोखा सादर करावा.
🔹 दिव्यांगांसाठी निधी कोणत्या बाबींवर खर्च झाला याचा तपशील जाहीर करावा.
🔹 घरकुल योजनेअंतर्गत किती दिव्यांग लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली याची माहिती द्यावी.
🔹 मालमत्ता कर सवलतीचा लाभ किती दिव्यांग बांधवांना देण्यात आला याचा खुलासा करावा.
या निवेदनाच्या प्रती पंचायत समिती पाचोरा तसेच जिल्हा परिषद जळगाव येथेही सादर करण्यात आल्या आहेत.
आंदोलनाचा इशारा
मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
प्रहार संघटना, बांबरुड (राणीचे) पदाधिकारी:
चि. विजय श्रीराम पवार – अध्यक्ष
श्री. राजेंद्र अर्जुन निकम – उपाध्यक्ष
श्री. संग्राम पुंडलिकराव आढाव – सचिव
अविनाश भास्कर दारकुंडे – सहसचिव
श्री. माधवराव रामदास सोनवणे – सल्लागार
श्री. सचिन लखु काळे – खजिनदार
श्री. राजेंद्र मधुकर वाणी – सदस्य
फारूक कपूर मेवाती – सदस्य
सचिन ज्ञानेश्वर गोराडे – सदस्य

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..