प्रभाग क्र. १४ मध्ये उद्या स्वच्छता मोहीम व नागरिक तक्रार निवारण बैठक; नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष राहणार उपस्थित


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी):
नगरपालिका प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या उद्देशाने उद्या विशेष स्वच्छता मोहीम तसेच नागरिक तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रभागातील नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील व नगरसेवक श्री. प्रदीप भगवान वाघ यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
या बैठकीसाठी नगराध्यक्ष सौ. सुनीता ताई किशोर आप्पा पाटील तसेच उपनगराध्यक्ष श्री. किशोर बारवकर हे स्वतः उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
या बैठकीत नागरिकांनी आपल्या वार्डातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वीज, कचरा व्यवस्थापन तसेच इतर नागरी समस्यांबाबत लेखी किंवा तोंडी स्वरूपात तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन नगरसेविका सौ. सुरेखा पाटील व नगरसेवक श्री. प्रदीप वाघ यांनी केले आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
प्रभागातील सर्व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..