स्वातंत्रवीर सावरकरांचा इतिहास, युद्धशास्त्र, चाणक्य नितीचा अभ्यास होता –सीमा शिसोदे
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
कोळगाव : "स्वातंत्र्य वीर सावरकर म्हणजे ज्वाजल्य देशभक्ती, हिंदुत्व उच्च कोटीचे साहित्य, प्रखर बुद्धी वाद, अभ्यास पूर्ण नियोजन होय, ते समाज सुधारक, लेखक, क्रांतिकारक होते प्रथम राष्ट्र हे त्यांचे ध्येय होते त्यासाठी त्यांनी काळ्या पाण्याची अंदमानात शिक्षा भोगली, नैराश्य आले की ते स्व समुपदेशन करत क्रांती कार्य करतांना केवळ प्राणत्याग नव्हे तर विजयी वीर झाले पाहिजे, म्हणून सावरकर चाणक्य नितीने कार्य करायचे" असे प्रतिपादन गो.पु.पाटील विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सीमा शिसोदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश आनंदा कोळी होते.
येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित गो. पु. पाटील विद्यालय व कला व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा मनोज पवार पाटील यांनी केले. प्रास्ताविक मनेश पाटील यांनी केले तर आभार प्रा मनीषा बोरसे यांनी मानले.
कार्यक्रमास गो पु पाटील विदयालय चे मुख्याध्यापक अनिल पवार,पर्यवेक्षिका सौ सीमा शिसोदे , प्रा प्रशांत पाटील, प्रा दिनकर सूर्यवंशी, राहुल सोनवणे प्रा प्रविणा पाटील प्रा मनीषा बोरसे सुनीता भोसले मनोज पाटील श्रीकांत हिरे तेजस पवार,तसेच प्राध्यापक प्राध्यापिका ,शिक्षकवृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment