"नगरपरिषद आपल्या दारी” मोहिमेने पाचोरात प्रशासन नागरिकांच्या दारात; प्रभाग १४ मध्ये तक्रार निवारण शिबिराचे आयोजन

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल 

पाचोरा (प्रतिनिधी) :
प्रजासत्ताक दिन व संत गाडगे बाबा जयंतीचे औचित्य साधून पाचोरा नगरपरिषदेकडून नागरिकाभिमुख प्रशासनाचा नवा उपक्रम “नगरपरिषद आपल्या दारी – स्वच्छता व तक्रार निवारण मोहीम” सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील विविध नागरी समस्या थेट नागरिकांकडून ऐकून तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आ. किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तथा मा. नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोरआप्पा पाटील व उपनगराध्यक्ष श्री. किशोर गुणवंत बारवकर यांच्या संकल्पनेतून ही अभिनव मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांसाठी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मारोती मंदिर, कृष्णापुरी, पाचोरा येथे करण्यात आले आहे.
या शिबिरात पाणीपुरवठा, घंटागाडी व कर्मचारी समस्या, झाडू व आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारी, स्ट्रीट लाईट व सोलर लाईट बिघाड, भुयारी गटार अडथळे, प्रॉपर्टी चेंबर जाम होणे, फवारणी तसेच इतर नागरी समस्या यावर थेट निवारण करण्यात येणार आहे.
नगरसेवक श्री. प्रदीप भगवान वाघ व नगरसेविका सौ. सुरेखा अशोक पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, स्वच्छ व सुंदर पाचोऱ्यासाठी नागरिकांचे सक्रिय सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रशासन थेट नागरिकांच्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत नगरपरिषदेकडून नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचा हा उपक्रम पाचोरा शहरासाठी आदर्श ठरणार असल्याचे नागरिकांतून कौतुक व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..