केरळमध्ये पाचोऱ्याच्या कु. चेतना हिरे यांनी मलयाळममध्ये संवाद सुरू करताच महापौर-उपमहापौर चकित झाले; महापौर उपमहापौरांसह उपस्थितांनी आवाजाच्या व टाळ्यांच्या जल्लोषात कौतुक केले.

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल

केरळ राज्यातील Thrissur महानगरपालिकेत आयोजित आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवकांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांची जिज्ञासा वाढावी तसेच देशातील विविध राज्यांची परंपरा, संस्कृती, खाद्यसंस्कृती, पर्यटन, प्रशासन आणि व्यवसायातील संधी यांची ओळख व्हावी या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला महापौर ए. प्रसाद, उपमहापौर डॉ. निजी जस्टिन, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्रातील ‘माय भारत’चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी थ्रिसूर जिल्हा युवा अधिकारी बिन्सी मॅडम व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.
यावेळी  श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे यांनी आपल्या संवादाची सुरुवात “एल्लावरक्कुम नमस्कारम, एन्टे पेरू चेतना हिरे” अशी आत्मविश्वासपूर्ण मलयाळम भाषेत केली. मराठी भाषिक विद्यार्थिनीने ओघवत्या मलयाळममध्ये संवाद साधताच महापौर व उपमहापौर स्वतः चकित झाले व आवाजाच्या व टाळ्यांच्या जल्लोषात  आनंद व्यक्त करत  तिचे कौतुक केले आणि उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाटात तिला उत्स्फूर्त प्रतिसाद केला.
या अविस्मरणीय क्षणामुळे महाराष्ट्र आणि केरळ यांच्यातील सांस्कृतिक मैत्री अधिक दृढ झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद