पाचोरा तालुक्यात १३ केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा; १,९३१ विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या रविवारी


पाचोरा (प्रतिनिधी):
पाचोरा तालुक्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी १३ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने व्यापक नियोजन केले असून परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
गटशिक्षणाधिकारी विजय पवार व शा. पो. आ. अधीक्षक सरोज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यावर्षी इयत्ता पाचवीसाठी १,२६२ तर इयत्ता आठवीसाठी ६६९ असे एकूण १,९३१ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार आहेत.
परीक्षा नियंत्रणासाठी प्रत्येक केंद्रावर भेटी व निरीक्षणाचे नियोजन करण्यात आले असून गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
‘मिशन स्कॉलरशिप’ उपक्रमांतर्गत यावर्षी दोन सराव परीक्षा घेण्यात आल्या असून विद्यार्थ्यांसाठी शाळा स्तरावर नियमित मार्गदर्शन वर्गही आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यास मोठी मदत झाली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा कामकाजासाठी गटशिक्षणाधिकारी विजय पवार, अधीक्षक सरोज गायकवाड, गिरीष भोयर, सुनील शिवदे, नूर खान, राकेश धायबर तसेच सर्व केंद्रप्रमुख व शिक्षक कर्मचारी सक्रिय सहभाग घेत असून परीक्षा पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी शिक्षण विभाग सज्ज आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..