"संत साहित्यातून मराठीचा गोडवा मिळतो"- वाल्मीक पाटील
कोळगाव- मराठी साहित्यात लेखक कवीनी संत, परंपरा, सण,संस्कृती आणि बोली भाषेतून विपुल लेखन झालेले आहे कोकणी, तावडी, वऱ्हाडी, अहिराणी अशा भाषेतून अनेक शब्दांची भर पडत असते मराठीला अमृता समान मानले गेले आहे वांगंमय,म्हणी, श्लोक, आदिवासी गाण्यांनीही मराठीला अलंकारित केले आहे संत तुकाराम रामदास ज्ञानेश्वरच्या ओवी, अभंग,अमृतवाणी यांच्यातून मराठी भाषेचा संत साहित्यातून गोडवा मिळतो"असे मार्गदर्शन पर विचार प्रा. वाल्मीक पाटील (मराठी विभाग) यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व व विज्ञान महाविद्याल याचे प्राचार्य प्रा.सुरेश कोळी होते.यावेळी गो पू.पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल पवार व पर्यवेक्षिका सीमा सिसोदे होत्या
येथील कर्मवीर तात्या साहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाच्यातर्फे कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी वि वा शिरवाड कर माता सरस्वती व तात्यासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन मान्य वरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा मनोज पाटील, सूत्रसंचालन प्रा मनोज पवार तर आभार प्रदर्शन प्रा प्रविणा पाटील यांनी केले यावेळी प्रा प्रशांत पाटील, प्रा मनेश पाटील, प्रा दिनकर सूर्यवंशी, प्रा राहुल सोनवणे, प्रा मनीषा बोरसे प्रा सुनीता पाटील, श्रीकांत हिरे, तेजस पवार, चेतन पाटील, सनी पाटील उपस्थित होते
Comments
Post a Comment