संत गाडगेबाबा समानता व स्वच्छतेचे दूत होते – अनिल पवार

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
कोळगाव : देव दगडात नसून माणसात आहे अडाणी राहुल नका चमत्कारावर विश्वास ठेऊ नका, देवळात जाऊ नका शाळेत जा अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेचा ना यनाटासाठी बाबांनी जीवन खर्ची केले अपंग अनाथ याची सेवेकरी म्हणून संत गाडगेबाबा ओळखले जात, ते लोकांना फक्त उपदेश करण्यापेक्षा कोणतेही कार्य स्वतः करून दाखवले तर समाजाचे सहकार्य आपोआप मिळते. संत गाडगेबाबांनी गावातील रस्ते, मैदाने, शाळा व मंदिरे स्वतः साफ करून त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना स्वच्छता, समानता व समाजसेवेचा संदेश दिला. म्हणूनच त्यांना स्वच्छता दूत म्हटले जाते, असे प्रतिपादन गो. पु. पाटील विद्यालयाचे मुख्याध्या पक अनिल पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश आनंदा कोळी होते.
येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित गो. पु. पाटील विद्यालय व कला व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले. प्रास्ताविक मनोज पवार यांनी केले तर आभार संदीप बाविस्कर यांनी मानले.
कार्यक्रमास पर्यवेक्षिका सौ सीमा शिसोदे मॅडम, श्री आर.ए पाटील,देसले सर,पवार मॅडम,केदार मॅडम प्रा तुषार पाटील, प्रा दिनकर सूर्यवंशी, प्रा प्रविणा पाटील प्रा मनीषा बोरसे प्रा सुनीता भोसले, श्रीकांत हिरे तेजस पवार, चेतन पाटील तसेच प्राध्यापक  प्राध्यापिका ,शिक्षकवृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद