आमदार किशोर आप्पांच्या कार्याची भुरळ; चिमुकल्यांनी घेतली आमदारांची आवर्जून भेट..
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विविध विकासकामांची आणि जनसंपर्काची चर्चा मतदारसंघात सातत्याने होत असताना, त्यांच्या कार्याची भुरळ आता चिमुकल्यांनाही पडल्याचे भावनिक चित्र नुकतेच पाहायला मिळाले.
पाचोरा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती श्री. प्रमोद सोनार यांच्या कन्या युक्ता प्रमोद सोनार व मुक्ता प्रमोद सोनार, तसेच प्रसिद्ध डॉक्टर श्री. दिनेश सोनार यांचे पुत्र श्रीराज दिनेश सोनार व दिग्विजय दिनेश सोनार यांनी आप्पासाहेब श्री. राजाराम नागो सोनार यांच्या नातवंडांसह आमदार किशोर आप्पा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चिमुकल्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांचे स्वागत केले. या भेटीमुळे उपस्थितांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा, नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष आणि मतदारसंघातील जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याबद्दल नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीची प्रचिती या छोटेखानी भेटीतून आली. चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे घेतलेली ही भेट आमदारांच्या जनसंपर्काची भावनिक झलक ठरली.
“किशोर आप्पांच्या कार्याची भुरळ आता चिमुकल्यांनाही!” अशी चर्चा या भेटीनंतर परिसरात रंगली असून, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होत असल्याचे चित्र या निमित्ताने समोर आले.
Comments
Post a Comment