‘वृक्षारोपण’पुरते न थांबता संवर्धनाचा आदर्श! काकनबर्डी येथे २४० रोपांना ठिबकद्वारे पाणी
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
काकनबर्डी : दि. १५ ऑगस्ट रोजी काकनबर्डी येथे करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील रोपांचे संगोपन करण्यासाठी दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सामाजिक बांधिलकीतून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. जवळपास २४० रोपांपर्यंत ठिबक सिंचनाद्वारे पाणी पोहोचावे, यासाठी पाइपलाइन टाकून ठिबकच्या दोऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे वृक्षारोपणानंतर रोपांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीतून पुढाकार घेण्यात आला आहे.
हा उपक्रम खंडेराव देवस्थान, काकनबर्डी, ओझर क्षत्रिय ग्रुप पाचोरा, अरमान फाउंडेशन पाचोरा, एम.के. अॅग्रो प्रा. लि. नाशिक, ग्रीन अर्थ फाउंडेशन पाचोरा, नंदकिशोर पाटील इलेक्ट्रिकल्स खेडगाव, गोतावळा ग्रुप, जन औषधी मेडिकल (कासार), शारदाई गोविंद समर्थ, खेडगाव-ओझर ग्रामपंचायत ग्रुप तसेच ओझर व अंतुर्ली विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.
वृक्षारोपण करून केवळ फोटो काढण्यापेक्षा लावलेल्या रोपांचे पुढील काळात संगोपन करणे आवश्यक असते. हीच जाणीव ठेवून २४० रोपांना ठिबकद्वारे नियमित पाणी मिळण्याची व्यवस्था करण्यात आल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
दरम्यान, खंडेराव महाराज देवस्थान परिसरात नंदकिशोर पाटील, खेडगाव यांच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. उपस्थितांनी या अन्नदानाचा लाभ घेतला.
या उपक्रमाच्या प्रसंगी खलील दादा देशमुख, पप्पू राजपूत, गणेश पाटील (सभापती, मार्केट कमिटी), नंदू पाटील, बालाजी ग्रुप, सतीश बाप्पू शिंदे, फहम शेख, संजय पाटील, शैलेंद्र पाटील, मंगेश समवंशी, सोपनील राजपूत, नंदकिशोर पाटील, परमेश्वर पाटील, सुधाकर पाटील, यदनेश कासार, अजाबराव पाटील, भरत पाटील, भगवान पाटील, शांताराम पाटील, पप्पू जाधव, संदीप शाहापुरे, किशोर पुराणिक, संजय कानडे, अमोल जाधव, सुधीर वारुळे, सुकदेव सोनवणे, सरफराज पिजारी, हेमराज पाटील, विजय पाटील, बंडू ढमाले, रविंद्र मोरे, ज्ञानेश्वर पाटील, नितीन पाटील, अनिल परदेशी, सतीश परदेशी, अॅड. नवीन तसेच पत्रकार बांधव जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले,चिंतामण पाटील,भुवनेश दुसाने, किशोर रायसाकडा, मिलिंद सोनवणे, नंदू शेलकर,राजेंद्र खैरनार, भोला पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment