नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात; जळगाव जिल्हा प्रशासनाचे आवाहन
संपादक : राजेंद्र खैरनार, सत्य शोध न्यूज, पाचोरा
जळगाव : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक व नागरिक तेथे अडकले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्या वतीने माहिती संकलनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची अचूक माहिती प्रशासनापर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी तातडीने संबंधित ऑनलाइन लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. रोहन घुगे यांनी केले आहे.
🔗 माहिती नोंदविण्यासाठी लिंक
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांची माहिती, संपर्क तपशील व आवश्यक मदतीची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही माहिती दडवून न ठेवता शक्य तितक्या लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📞 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
दूरध्वनी : 0257-2223180 / 2217193
मोबाईल : 9373789064
नेपाळमध्ये अडकलेल्या आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे आणि संबंधितांची माहिती तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment