श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न....! खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या पालक मेळाव्यात पालक भावुक...!
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
पाचोरा( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,श्री. गो.से.हायस्कूल,पाचोरा येथे 24 ऑगस्ट सोमवार रोजी येथील कलादालन येथे सकाळी दहा वाजता मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शाळेतील शिक्षक रुपेश पाटील यांनी कार्यक्रमाची सुरुवात ईशास्तवानाने केली. पर्यवेक्षक महेश कौडिण्य यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना गतवर्षात शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबवलेले उपक्रम सांगितले तसेच विद्यार्थी गुणवत्ता विकास व्हावा म्हणून पालकांच्या सहभागाची देखील अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एन. आर. पाटील. यांनी शाळेतील विविध उपक्रम,स्पर्धा परीक्षा यांची माहिती देताना "माझी शाळा, सुंदर शाळा" उपक्रमात विद्यालयाने तालुक्यातून प्रथम बक्षीस मिळवले असल्याचे सांगितले.
पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यासपीठावर पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक महेश कौंडिण्य, पालक प्रतिनिधी बापू दगडू पाटील, नाझिया शेख, मुस्कान नाथानी उपस्थित होते. प्रतिनिधीक स्वरूपात विद्यालयातर्फे विशाल शिनकर, किरण ब्राह्मणे, राणी मराठे , छाया सोनवणे, शाहीनबी पटेल या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख रवींद्र बोरसे यांनी आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला बहुसंख्य पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment