विद्यार्थिनींच्या स्वनिर्मित राख्यांचे सादरीकरण
पाचोरा (प्रतिनिधी )
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा विद्यालयात विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पकतेने व कलाकौशल्याने तयार केलेल्या आकर्षक राख्यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थिनींनी विविध रंग, धागे, मोती, सजावटीच्या वस्तू यांचा वापर करून सुंदर व नाविन्यपूर्ण राख्या तयार केल्या होत्या.
या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला व कल्पनाशक्तीला वाव मिळाला. तसेच ‘स्वनिर्मिती, स्वावलंबन आणि बंधुभाव’ या मूल्यांचा सुंदर संदेश विद्यार्थिनींना मिळाला. सर्व विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांच्या कलाकृतींचे कौतुक करण्यात आले. त्यांना कलाशिक्षक प्रमोद पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक एन. आर.पाटील. पर्यवेक्षिका अंजली गोहिल, महेश कोंडीन्य, प्रीतमसिंग पाटील, सुबोध कांतायन, ज्योती पाटील मॅडम.यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले.
Comments
Post a Comment