जि.प.प्राथमिक शाळा, मोंढाळे ता. पाचोरा जि. जळगाव येथे स्वच्छत्ता अभियानात पालकांचा सक्रिय सहभाग.
पाचोरा -येथील पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये शनिवारी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गट विकास अधिकारी के बी अंजने, गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शना शाळा स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. केंद्र प्रमुख-श्री.अनिल वराडे, मुख्याध्यापक श्री.सुनिल पाटील, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, ग्रा.पं. चे स्थानिक पदाधिकारी, शिक्षण प्रेमी नागरिक, उत्साही तरुण वर्ग यामध्ये सहभागी झाले. जिल्हा परिषद मराठी शाळा येथे स्वतः हाती झाडू घेऊन सफाई केली.
Comments
Post a Comment