सिंधी कॉलनीत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज
पाचोरा : आरोग्य वर्धिनी केंद्र, सिंधी कॉलनी यांच्या वतीने सोमवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता शिव मंदिर, दशहरा मैदान, सिंधी कॉलनी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात ३० वर्षांवरील नागरिकांची BP, मधुमेह (डायबिटीस) तसेच कॅन्सर संदर्भातील प्राथमिक तपासणी करण्यात आली व मोफत औषधी देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील गवळी, स्टाफ नर्स प्रतीक्षा, आरोग्य सेवक प्रांजल पाटील यांनी नागरिकांची तपासणी केली.
यावेळी वार्डातील गोपालदास वासवानी व नगरसेविका सौ. कविताताई व उमेश (बंटी भाऊ) हटकर यांची प्रमुख उपस्थिती होते. नागरिकांना शिबिराची माहिती मिळावी व अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी नगरसेवक गोपालदास वासवानी व बंटी भाऊ हटकर यांनी परिसरात प्रत्यक्ष संपर्क साधून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली.
शिबिरामध्ये नगरसेवक श्री. गोपालदास वासवाणी, बंटी भाऊ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गवळी तसेच त्यांचे सहकारी यांचे सिंधी नवजवान सेवा मंडळाच्या सभासदांकडून सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अँड. राजेंद्र डी. वासवाणी व रूपेश बी हटकर यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व लक्षात घेता आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याची संधी मिळाली.
नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता भविष्यातही अशा प्रकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment