पाचोरा तालुक्यात शाळा स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न...! दीडशे जिल्हा परिषद शाळांसह सत्तर खाजगी शाळांचा उत्स्फूर्त सहभाग...!
पाचोरा -येथील पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये शनिवारी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गट विकास अधिकारी के बी अंजने, गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख, विशेष शिक्षक, गट साधन केंद्र कर्मचारी यांचेसह सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, शिक्षण प्रेमी नागरिक, उत्साही तरुण वर्ग यामध्ये सहभागी झाले. गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी बांबरुड राणीचे गावात माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू आणि मराठी शाळा येथे स्वतः हाती झाडू घेऊन सफाई केली.पाचोरा तालुक्यातील खाजगी शाळांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.जि प शाळांमधील उपलब्ध भौतिक सुविधाचा आढावा घेण्यात आला असून एकत्रित अहवाल जिल्हा परिषद जळगाव कडे देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा विभागाचा निर्धार असून स्पेलिंग बी स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग, निपुण अँपचा वापर, आनंददायी शनिवार, सामूहिक कवायत, कॉपीमुक्त परीक्षा अभियान, शिक्षण परिषद हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी कळवले आहे.
*स्वच्छता अभियान सहभाग*
केंद्र-14
सहभागी जि प शाळा एकूण संख्या -148
सहभागी शिक्षक संख्या -512
सहभागी पालक संख्या -1372
सहभागी पदाधिकारी संख्या-377
सहभागी तरुण वर्ग -989
खाजगी शाळा -70
Comments
Post a Comment