जि.प.प्रा.शाळा मोंढाळे येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
मोंढाळे (प्रतिनिधी):
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोंढाळे येथे रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात आणि स्नेहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
समारंभा दरम्यान शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या विद्यार्थी बंधूंचे औक्षण करून आणि पूजा करून त्यांच्या मनगटावर प्रेमाचे प्रतीक असलेली राखी बांधली. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी भावा-बहिणीच्या पवित्र नात्याची जपवणूक करत आपुलकीचा संदेश दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि सर्व उपशिक्षक बंधू-भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment