सोयगाव शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी तर्फे आयडियलस्टडी ॲप चे वितरण


राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध‌ न्युज
 सोयगाव.....
 रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे सोयगाव  येथील कै बाबुराव काळे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी ॲप चे वितरण नुकतेच करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक  निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रमाला रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट सेक्रेटरी डॉ. प्रशांत सांगडे, असिस्टंट गव्हर्नर भरत सिनकर, सेक्रेटरी एन्क्लेव्ह डॉ. मुकेश तेली, ज्येष्ठ रोटेरियन चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक तथा माजी क्लब अध्यक्ष प्रा. डॉ.पंकज शिंदे, उप मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस,  योगेश काळे, अंजली कथलकर, आशा पंडित, सागर पाटील, प्रणय कुलकर्णी, संजय डापके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत येथील दहावीच्या ४० विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त आयडियल स्टडी ॲप मोफत वाटप करण्यात आले. 

 याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या कार्याची ओळख करून दिली. प्रशांत सांगडे व संजय कोतकर यांनी ॲप कसे हाताळावे याबद्दलची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर एलीस यांनी केले तर योगेश काळे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..