पाचोरा तालुक्यात 227 वयोवृध्द व दिव्यांग मतदार यांनी केले गृह मतदान

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वयोवृध्द (85+) व दिव्यांग (PWD) मतदार त्यांच्यासाठी मतदानापासून वंचित राहू नये या करीता गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत PWD-55 व 85+-187 असे एकूण 242 मतदार यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दिनांक-14/11/2024 व 15/11/2024 या दोन दिवशी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

त्यानुसार दिनांक-14/11/2024 रोजी घेण्यात आलेल्या 223 गृह मतदानापैकी दिव्यांग (PWD)-50 व वयोवृध्द (85+)- 161 यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला व उर्वरित शिल्लक 12 मतदारापैकी 7-मयत, 03 बाहेरगांवी, 1 नकार व 1 दवाखान्यात दाखल आहे. तसेच दिनांक 15/11/2024 रोजी घेण्यात आलेल्या 19 गृह मतदानापैकी दिव्यांग (PWD) - 05 व वयोवृध्द (85+)- 11 असे एकुण 16 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला उर्वरित 03 मतदार मयत आहेत. म्हणजेच 242 पैकी 172 वयोवृध्द (85+) व दिव्यांग (PWD) 55 अश्या एकूण 227 मतदार यांनी सदर कालावधीत गृह मतदान केले.

या प्रक्रीयेसाठी श्री. भूषण अहिरे, निवडणूक निर्णय अधिकारी, 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखालील, श्री. विजय बनसोडे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, पाचोरा, श्रीमती शितल सोलाट, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, भडगांव, सेक्टर ऑफीसर व त्यांच्या पथकातील नियुक्त कर्मचारी यांनी कामकाज केले.

सदरची प्रेस नोट उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांचे मान्यतेने देण्यात येत आहे.

ठिकाण :- पाचोरा,

दिनांक:- 15/11/2024

(भूषण अहिरे)

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद