पाचोरा येथे मतदान यंत्रे सिलींग सेंटींगचे कामकाज पुर्ण !


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार 18- पाचोरा विधानसभा मतदार संघासाठी 355 मतदान केंद्रासाठी दिनांक 11/11/2024 रोजी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा येथे 18 पाचोरा विधानसभा मतदार संघातील 354+1 मतदान केंद्राकरीता SYMBOL UPLOADING व BU. CU PAIRING चेक कामकाज करण्यात आले. श्री. भूषण अहिरे, निवडणूक निर्णय अधिकारी, 18- पायोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा, श्री. विजय बनसोडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार पाचोरा, श्रौमती शितल सोलाट, तहसिलदार भडगांव श्री. रणजित पाटील, नायब तहसिलदार (निवडणूक) व उमेदवार प्रतिनिधी यांचे समक्ष दिनांक- 11/11/2024 रोजी सकाळी 9.50 वाजता महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा येथील स्ट्रॉग रुम व्हिडीओ चित्रीकरण करुन उघडण्यात आला. SYMBOL UPLOADING व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कार्यान्वित करणे (उमेदवार निश्चिती) (EVM COMMISSIONING) साठी स्ट्रॉग रुम उघडण्यासाठी सदर दिवशी सकाळी 8.00 वाजता उपस्थित राहणेबाबत उमेदवार यांना दिनांक-07/11/2024 रोजी, मेल, व्हॉटसॲप व्दारे व प्रत्यक्ष पत्राव्दारे कळविण्यात आले होते. सदर दिवशी श्री. अमोल ठाकुर, श्री. श्रीकांत अशोक गरुड, श्री. ज्ञानेश्वर पंडीत पाटील, श्री. जितेंद्र विठठलराव पेंढारकर, श्री. किशोर बाबुराव शिणकर, श्री. सुनिल तुळशीराम पाटील व श्री. रुपेश शिंदे हे उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ करीता एकुण CU 426, BU-426 व VVPAT-461 प्राप्त झालेले होते. तरी दिनांक-11/11/2024 रोजी VVPAT मशीन व BU, CU, PAIRING करण्यात आली व 461 VVPAYT वर SYMBOL UPLOADING चे कामकाज पूर्ण करण्यात आले.
त्यांनतर EVM COMMISSIONING चे 1 ते 20 टेबल निहाय BU, CU, VVPAT प्रत्येकी मतदान केंद्राचे मशिन EVM COMMISSIONING कामी देण्यात आले. त्यांनतर त्यांचे COMMISSIONING पुर्ण झाल्यानंतर BU, CU, VVPAT स्ट्रॉग रुमला मतदान केंद्रनिहाय ठेवण्यात आले.
त्यांनतर 5% मतदान केंद्राच्या EVM वर 1000 वोटींग कामी 22 मतदान केंद्राचे मॉक पोल घेणेकामी सर्व मतदान केंद्राच्या (राखीव सह) करुन पांढऱ्या रंगाच्या डब्यात टाकण्यात आल्या. सदर चिठ्ठया लकी ड्रॉ पध्दतीने श्री. भूषण अहिरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांच्या समक्ष उमेदवार प्रतिनिधी यांच्या हस्ते 22 मतदान केंद्राच्या सोडचिठ्ठया काढण्यात येवून मतदान यंत्र निवडण्यात आले. त्यानंतर सदरील 22 मशिन क्रमनिहाय मॉकपोल च्या टेबल क्र. 01 ते 22 वर मॉकपोल घेणेकामी देण्यात आले.
सदरचा संपूर्ण प्रक्रीयेत श्री. भूषण अहिरे, निवडणूक निर्णय अधिकारी, 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.विजय बनसोडे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, पाचोरा, श्रीमती शितल सोलाट, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार, भडगांव, श्री. रणजित पाटील, निवडणूक नायब तहसिलदार, पाचोरा, श्री. विनोद कुमावत, निवासी नायब तहसिलदार, पाचोरा, सेक्टर ऑफीसर व त्यांच्या पथकातील नियुक्त कर्मचारी यांनी कामकाज केले.
सदरची प्रेस नोट उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांचे मान्यतेने देण्यात येत आहे.
ठिकाण :- पाचोरा,
दिनांक:- 14/11/2024
(भूषण अहिरे) निवडणूक निर्णय अधिकारी,
18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा
उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद