मतदार राजानों....सावधान... आपले मत देण्यासाठी केंद्रावर जातांना मोबाइल घरीच ठेवून जा..!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
मतदार राजानों....सावधान... आपले मत देण्यासाठी केंद्रावर जातांना मोबाइल घरीच ठेवून जा..!

झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेकांवर गुन्हे दाखल केले लेले आहेत------------------------------------------ लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करताना काहींनी मोबाइलवर ईव्हीएमचे चित्रीकरण केले होते. ते व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग केला गेला होता. असे प्रकार परत होऊ नयेत, याकरिता विधानसभा निवडणुकांमध्ये. मतदान केंद्रावर मतधारकांना  मोबाइलसोबत  प्रवेश बंधनकारक केला गेला आहे.निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याकडे नजरचुक केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत काही मतदान स्ळांवर मतदार थेट ईव्हीएमपर्यंत मोबाइल घेऊन गेले होते. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते व्हे. व्हिडीओ व्हॉट्सॲपच्या स्टेटसला ठेवले होते.
हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी भरपूर जणांवर गुन्हा दाखल केला होता. मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
नेते, कार्यकर्त्यांचा आगाऊपणा
सर्वसामान्य मतदार आदेशाचे पालन करतात. मात्र नेते आणि त्यांचे काही पदाधिकारी,कार्यकर्ते अटी डावलून अधिकारी-कर्मचाऱ्यांशी वाद निर्माण करु बघतात, प्रसंगी दमदाटी करतात. लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मतदानाचे व्हिडीओ तयार करून ते व्हायरल केले होते. आपण नेते आणि उमेदवारांशी किती प्रामाणिक आहोत हे दाखविण्याच्या प्रयत्नात असे प्रकार घडत असल्याचे दिसून येते.

मतदान केंद्रात मोबाइलसोबत मतदार येणार नाहीत यासाठी निवडणूक कर्मचारी तसेच पोलिसांना खबरदारी चे आदेश दिले आहे. मतदारांना सूचना देणे, त्यांना बाहेरच मोबाइल ठेवण्यास सांगणे, तपासणी करणे हे काम कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद