सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024च्या अनुषंगाने 18/11/2024 सायंकाळी 6.00 वा. पासुन) ते मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत (दि.21/11/2024 रात्री 12.00 वा. पावेतो) पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविण्यावर एकत्रितपणे वावरण्यावर याव्दारे प्रतिबंध करण्यात येत आहे.-जिल्हाधिकारी जळगाव
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे कार्यालय, जळगाव
(गृह शाखा)
आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव, ता.जि. जळगाव- 425 001
Email-homebranchialgaon@gmail.com
दूरध्वनी क्र. 0257-2220152
फैक्स नं. 0257-2220500
वाचले :- 1) भारत निवडणुक आयोग यांचेकडील पत्र क्र.No.ECI/PN/149/2024 दि.15/10/2024
2) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163
क्रमांक/दंडप्र/1/कावि/2024/02
दिनांक: 18/11/2024
आदेश
ज्या अर्थी, मा. भारत निवडणुक आयोगाने दि. 15/10/2024 रोजी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. व या दिनांकापासुन आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जळगांव जिल्हयातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जळगांव जिल्हयाकरिता मतदानपुर्वीच्या पुर्वीच्या आदल्या दिवसापासून (दि. 18/11/2024 सायंकाळी 6.00 वा.पासुन) ते मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत (दि.21/11/2024 रात्री 12.00 वा. पावेतो) पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविण्यावर एकत्रितपणे वावरण्यावर प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने आणि ज्याअर्थी, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार सर्व संबंधितास नोटीस देवुन त्यांचे म्हणणे ऐकुन घेणे सदयस्थितीस शक्य नसल्याने हा एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, मी, आयुष प्रसाद, जिल्हादंडाधिकारी, जळगांव भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये, मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुक- 2024 च्या अनुषंगाने जळगांव जिल्हयाकरिता मतदान पुर्वीच्या आदल्या दिवसापासुन (दि. 18/11/2024 सायंकाळी 6.00 वा. पासुन) ते मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत (दि.21/11/2024 रात्री 12.00 वा. पावेतो) पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविण्यावर एकत्रितपणे वावरण्यावर याव्दारे प्रतिबंध करण्यात येत आहे.
जळगांव जिल्हयातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 करिता हा आदेश निवडणुकीचे कामे हाताळतांना व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, म्हणुन दिनांक 18/11/2024 चे सायंकाळी 18.00 वाजेपासून ते दिनांक 21/12/2024 चे रात्री 12.00 वाजेपावेतो अंमलात राहील.
सदरील आदेश आज दिनांक 11/2024 रोजी माझ्या सही व शिक्यानिशी पारीत केला असे.
Signed by
Ayush Prasad Date: 18.2024 18:01:47 जिल्हादंडाधिकारी जळगाव
प्रत:- पोलीस अधिक्षक जळगांव यांना सस्नेह अग्रेषित.
प्रतः - उपजिल्हा निवडणुक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव
प्रतः- नोडल अधिकारी, आचार संहिता कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव
प्रतः उपविभागीय दंडाधिकारी (सर्व) जळगांव जिल्हा
प्रतः सहायक निवडणुक निर्णय अधिकारी (सर्व) जळगांव जिल्हा
प्रतः तालुका कार्यकारी दंडाधिकारी, (सर्व) जळगाव जिल्हा
प्रतः- जिल्हा माहिती अधिकारी, जळगांव यांचेकडे प्रसिध्दीसाठी अग्रेषितः
Comments
Post a Comment