महाराष्ट्र शासन निवडणूक निर्णय अधिकारी, 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा"मतदानाइतके अमुल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकारी आम्हीप्रति, सर्व विभागप्रमूख, पाचोरा व भडगाव तालुका. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, मतदान जनजागृती साठी मॅरेथॉन रन मध्ये सहभागी होणे बाबत..( म.मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे दि.5 नोव्हेंबर 2024 रोजीचे पत्र,)वरीलप्रमाणे शासन पत्रान्वये कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहिर झाली असून दि.20/11/2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान करण्याकरीता मतदारांमध्ये जनजागृती होण्याकरीता मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे.सदर स्वीप कार्यक्रमांतर्गत 18, पाचोरा विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून एम एम कॉलेज चौक, पाचोरा असा - मॅरेथॉन इलेक्शन रन आयोजीत करण्यात आला आहे. या मॅरेथॉन मध्ये आपल्या विभाग / कार्यालय मधील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सहभागी होण्यासाठी आपले स्तरावरुन अवगत करावे व सर्व अधिकारी/ कर्मचारी उपस्थित राहतील याची खात्री करावी. मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी पांढरा टि शर्ट / शर्ट / पोशाख परिधान करणे आवश्यक राहील याची दक्षता घ्यावी.(भूषण अहिरे)निवडणूक निर्णय अधिकारी,18 पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा
महाराष्ट्र शासन निवडणूक निर्णय अधिकारी, 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा
"मतदानाइतके अमुल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकारी आम्ही
प्रति, सर्व विभागप्रमूख, पाचोरा व भडगाव तालुका.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, मतदान जनजागृती साठी मॅरेथॉन रन मध्ये सहभागी होणे बाबत..
( म.मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे दि.5 नोव्हेंबर 2024 रोजीचे पत्र,)
वरीलप्रमाणे शासन पत्रान्वये कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहिर झाली असून दि.20/11/2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान करण्याकरीता मतदारांमध्ये जनजागृती होण्याकरीता मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सदर स्वीप कार्यक्रमांतर्गत 18, पाचोरा विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून एम एम कॉलेज चौक, पाचोरा असा - मॅरेथॉन इलेक्शन रन आयोजीत करण्यात आला आहे. या मॅरेथॉन मध्ये आपल्या विभाग / कार्यालय मधील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सहभागी होण्यासाठी आपले स्तरावरुन अवगत करावे व सर्व अधिकारी/ कर्मचारी उपस्थित राहतील याची खात्री करावी. मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी पांढरा टि शर्ट / शर्ट / पोशाख परिधान करणे आवश्यक राहील याची दक्षता घ्यावी.
(भूषण अहिरे)
निवडणूक निर्णय अधिकारी,
18 पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा
Comments
Post a Comment