पाचोरा तालुक्यातील तमाम शेतकरी,आडतदार व्यापारी बांधवांना कळविण्यात येते की,"सार्वत्रिक निवडणुका 2024" च्या अनुषंगाने दि.19/11/24 ते 20/11/2024 या दोन दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद राहील.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकरी,आडतदार, व्यापारी यांना भारतीय निवडणूक आयोग दिल्ली,तसेच जिल्हाधिकारी यांच्या कडुन सुचित करण्यात येते ते वाचा खालील प्रमाणे

कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा

(मुख्य मार्केट यार्ड, पाचोरा जि. जळगांव (४२४२०१) मुख्य कार्यालय : (०२५९६) २४५३३२, २४५८४३ सभापती: (०२५९६) २४५५१९, सचिव : (०२५९६) २४४४९३
जा.क्र. २७६/२०२४-२५)

दि.१६/११/२०२४

जाहिर सूचना

कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे शेतीमाल खरेदी विक्रीसाठी येणारे तमाम शेतकरी, आडतदार, खरेदीदार व्यापारी यांना सूचित करण्यात येते की, भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांचे निर्देश व मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत 18 पाचोरा विधानसभा मतदार संघातील निवडणुकी करिता मतदान कर्मचारी पथकांना मतदान केंद्रावर पोहचवणे कामी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दि.१९/११/२०२४ ते २०/११/२०२४ रोजी बसेस लावण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा मध्ये मोकळी जागा उपलब्ध करून देणेबाबत उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा तथा निवडणूक निर्णय अधिकारी 18 पाचोरा विधानसभा मतदार संघ यांनी दि. २३/१०/२०२४ रोजीच्या पत्रानुसार कळविलेले आहे. त्याअनुषंगाने १) कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोराचे भाजीपाल्याच्या शेतीमालाचे लिलाव दि. १९/११/२०२४ ते २०/११/२०२४ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतलेला आहे.

२) तसेच दि.२०/११/२०२४ रोजी 18 पाचोरा विधानसभा मतदार संघातील

निवडणुकीकरिता दि.२०/११/२०२४ रोजी मतदान होणार असल्यामुळे बाजार समितीचे

लिलाव प्रक्रीयेसह सर्व प्रकारचे कामकाज बंद राहतील याची नोंद घ्यावी व बाजार समितीस

सहकार्य करावे.

उत्पन्न बाजार समिती

पाचोरा

स्वारना दि

७/१२/१९४

सभापती
 कृषी उत्पन्न बाजार समिती. पाचोरा जि. जळगाव,
पाचोरा जि. जळगाव

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..