विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने १८ पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी प्रक्रिये बद्दल निवडणुक अधिकारी यांच्या कडून २३नोव्हे. मतमोजणी संदर्भात तातडीची पत्रकार परिषद संपन्न -वाचा निवडणुक अधिकारी भुषण जी अहीरे साहेबांनी काय-काय दिली माहिती
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने १८ पाचोरा विधानसभा मतदार संघातील, दैनिक वृत्त संपादक/प्रेस रिपोर्टर/वार्ताहर यांची आज दिनांक २१/११/२०२४ रोजी ३-३० वाजता निवडणुक निर्णय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग यांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत दि.२३/११/२०२४ रोजी होणाऱ्या मतदान मोजणी पूर्व तयारी कामी निवडणूक निर्णय अधिकारी १८- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांचे कार्यालयातील बैठक हॉल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
सर्व प्रथम सर्व उपस्थितीत पत्रकार वार्ताहर यांचे मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांनी स्वागत केले, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक च्या पार्श्वभुमीवर दिनांक-२०/११/२०२४ रोजी १८- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत दिनांक-२०/११/२०२४ रोजी मतदानाची सुरुवात हि सकाळी ७.०० वाजेपासून सुरु होवुन काही मतदान केंद्रावर दुपारी ०४.०० वाजे नंतर मतदारानी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सदरील मतदान केंद्रावर रात्री ११.०७ मि.पर्यंत मतदान प्रक्रीया सुरळीतपणे पूर्ण झाली. दिनांक-२०/११/२०२४ रोजी मतदानाच्या दिवशी एकुण मतदार संख्या हि ३३३८६० असून त्यामध्ये पुरुष मतदार संख्या-१७२०६१, महिला मतदार संख्या १६१७९० व इतर मतदार संख्या -०९ होती. त्यापैकी मतदान केलेल्या पुरुष मतदार संख्या ११८५२६, महिला मतदार संख्या ११०८४६, इतर मतदार संख्या ५ असे एकुण संख्या-२२९३७७ एवढया मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावला.
१८- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत झालेल्या पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी हि ६८.८९% महिला मतदारांची टक्केवारी-६८.५१% व इतर मतदारांची टक्केवारी ५५.५६% असून १८- पाचोरा विधानसभा मतदार संघाची मतदारांनी मतदान केल्याची एकुण टक्केवारी हि ६८.७०% एवढी असल्याचे मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. सदर मतदान प्रक्रीयेत संपूर्ण मतदार संघात कुठल्याही कायदा व सुव्यवस्थतेचा प्रश्न उदभवला नाही सदर प्रक्रीया हि सुरळीतपणे पूर्ण पार पडली.
दिनांक-२०/११/२०२४ रोजी १८- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत मतदान प्रक्रीया हि पूर्ण झाली असून मतमोजणी दिनांक-२३/११/२०२४ रोजी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ एमएआयडीसी गोडाऊन गिरड रोड पाचोरा येथे D Block मध्ये १३५x५० या क्षेत्रात नियोजित केलेली आहे. सदर ठिकाणी दिनांक-२३/११/२०२४ रोजी मतमोजणीचे कामकाज हे सकाळी ६.०० वाजेपासून सुरु होवुन मतमोजणी कामकाज संपेपर्यंत होणार आहे. सदर मतमोजणी कामी भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचे व्दारे १८- पाचोरा विधानसभा मतदार संघाकरीता मा. सौम्यकेतू मिश्रा (आय.ए.एस.) OB Code S-३३४१४ यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करणेत आलेली आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ एमएआयडीसी गोडाऊन गिरड रोड पाचोरा या ठिकाणी दिनांक- २३/११/२०२४ रोजी मतमोजणी प्रक्रीया पार पाडण्यात येणार आहे. सदर ठिकाणी मतमोजणी बाबतचा आराखडा हा तयार असून त्यानुसार सदर दिवशी EVM मतमोजणीसाठी १४ टेबल हे निश्चित केलेले असून २६ फेऱ्यामध्ये प्रक्रीया होणार आहे. तसेच टपाली मतमोजणीसाठी ०८ टेबल निश्चित करणेत आलेले आहे. ETPBMS (सव्हिस वोटर) यांचे मतमोजणी ०४ टेबलावर निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी दिनांक २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजेपर्यंत प्राप्त होणारे टपाली मतपत्रिकेचे मतमोजणीची सुरुवात हि सकाळी ०८.०० वाजता सुरुवात करण्यात येणार आहे.
सदर मतमोजणी प्रक्रीयेत उमेदवार व त्यांचे २७ प्रतिनिधी यांना मतमोजणी कामी ओळखपत्र देण्यात आलेले आहे. मतमोजणीकामी जिल्हास्तरावरुन अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती सरमिसळ व्दारे करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या वेळी टेबल निहाय सुक्ष्म निरीक्षक, रो-ऑफीसर, ARO यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
सदर दिनांक-२०/११/२०२४ रोजी मतदान झालेनंतर EVM व VVPAT मशिन हे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ एमएआयडीसी गोडाऊन गिरड रोड पाचोरा येथील सुरक्षा कक्षात Strong Room येथे सुरक्षित ठेवण्यात आलेले असून सदर सुरक्षा कक्ष परिसराला त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. त्यात पहिले कवच मध्ये CRPF सुरक्षा रक्षक, दूसरे कवच मध्ये SRPF सुरक्षा रक्षक, तिसरे राज्य पोलीस दल असे कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे.
Comments
Post a Comment