गिरीश महाजन यांची सलग सात वेळा आमदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न.लोहारा विविध कार्यकारी चेअरमन ,संचालक मंडळ,तसेच भारतीय जनता पार्टी व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांचा संयुक्त उपक्रम.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक जामनेर तालुक्याचे भाग्यविधाते ना.गिरीश महाजन यांची सलग सातवेळा आमदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा विविध कार्यकारी चेअरमन,व्हा चेअरमन संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थ मंडळी व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५७ रुग्णांनी नाव नोंदणी करून मोफत तपासणी केली. यामधील १०८ रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे दिनांक ४ डिसेंबरला पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती आयोजक शरद अण्णा सोनार (भाजपा लोहारा कुऱ्हाड गटप्रमुख.) यांनी दिली. या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग एन्जिओग्राफी एन्जोप्लास्टी तपासणी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी,नाक,कान,घसा, मोतीबिंदू तसेच तिरडेपणा, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मुतखडा, अशा विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.
रुग्णांना मोफत मेडिकल गोळ्या औषधी देण्यात आले. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रभाकर चौधरी, सरपंच अक्षय जैस्वाल, उपसरपंच दीपक खरे, शरद अण्णा सोनार, सुनील क्षीरसागर, ग्रामसेवक गजानन काळे, ग्रामपंचायत सदस्य अमृत चौधरी, अर्जुन पाटील, सुरेश चौधरी ईश्वर देशमुख संजय चौधरी भास्कर आंबेकर विजय चौधरी ,माजी सरपंच रमेश चौधरी,रमेश लिंगायत,किसन पाटील, डॉ विकास पालीवाल,अण्णा चौधरी, उमेश देशमुख,अनिल तडवी, भास्कर भोई,शरद कोळी, हितेश पालीवाल, गोपाल पाटील, अमोल पाटील विशाल खाटीक पत्रकार चंद्रकांत पाटील, रमेश शेळके, गजानन क्षीरसागर हे उपस्थित होते, गोदावरी फाउंडेशन व डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय डॉक्टर,परिचारक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..