निवडणूक शांततेत पार पडणं हे नवीन जन्म झाल्यासारखं मला वाटतं.... निवडणूक निर्णय अधिकारी भुषण जी अहीरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व टिम, पोलिस प्रशासन चे मनापासून मानले आभार!

मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
गेल्या वर्षभर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उस्फुर्त प्रतिसाद व तत्परतेमुळे विना संकट इतकी मोठी जबाबदारी शांततेत पार पाडता आली... कोणतेही गालबोट न लागता नियमात व चाकोरीबाहेर न जाता एक मोठा टास्क आज पूर्ण झाला आहे... तसे तर निवडणूक शांततेत पार पडणं हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासाठी नवा जन्म झाल्यासारखे आहे असं आज मला वाटतंय...

कितीही प्रेशर असलं तरी चांगली टीम सोबत असेल तर कोणतेही काम उत्तम रित्या पार पडते...

विजयजी बनसोडे यांनी विराट कोहली सारखी प्रत्येक वेळी उत्तम बॅटिंग करून चव्हाणके साहेब यांची कधीही उणीव भासू दिली नाही

तहसीलदार सोलाट मॅडम यांना दिलेल्या जबाबदारी सहित इतर वेळेवर सांगितलेले कोणतेही काम यशस्वी रित्या पार पाडले...

उमेश,मयुर,जयंत (जरी शेवटी विकेट पडली असली तरी सुरुवातीला खूप मेहनत घेतली होती 😀) नकुल, दिलीप राजपूत, माने साहेब, मंडळ अधिकारी येवले यांनी उत्तम रित्या पूर्णवेळ निवडणूक शाखेत समर्पित कार्यकर्ते म्हणून काम केलं... 


हिमनग सारखं काम करणारी लांडे साहेब यांची पोस्टल ची टीम...
RO वर रोज नवनवे "बॉम्ब" पडल्यावर मग मार्ग काढणारी आचारसंहिता कक्ष देवरे साहेब यांची टीम...
EVM म्हणजे स्वतःची लेकरं अशी कुमावत साहेब यांची टीम... 
"साहित्यासाठी सक्षम "अशी देवकर यांची टीम...
"विना अडथळा वाहतूक व्यवस्था" वरद यांची टीम...
"मीडिया ला मस्त manage करणारी"अमोल पाटलांची टीम...
"पोटाची विशेष काळजी घेणारी" शिरभाते यांची टीम...

इतर सर्वच नोडल अधिकारी, सेक्टर ऑफिसर, "पोलिस विभाग" नगर पालिका, पंचायत समिती, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व अधिकारी कर्मचारी....


"जिल्हाधिकारी कार्यालय यांचा मोठा आधार तर होताच" मात्र प्रत्यक्ष लढाई लढताना मोठे मनुष्यबळ "नवनियुक्त तलाठी" यांचे मार्फत उपलब्ध झाले.. 

सर्वांचे पुनश्य: आभार व्यक्त करतो मनस्वी धन्यवाद🙏

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..