सेवा गृप नाशिक यांच्या वतीने समाज सेवा कार्याचा वसा घेऊन 5 व्या वर्षात यशस्वी वाटचाल करून पदार्पण...

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
       सेवा गृप नाशिक यांच्या वतीने समाज सेवेचा वसा घेऊन या महिण्यात दिवाळीचे मुहूर्त साधत ज्यांना दोन वेळेला जेवणाची कमतरता आहे अशा तीस (30) गरजू कुटूंबांना रेशन किट आणि मिठाई बाँक्सचे वाटप करून गरजूंचा चेहरावरचा आनंद दिसत होता तो पाहून आमचा आनंदही गगनात मावत नव्हता, जेवढा  त्यांना आनंद झाला तेवढाच आम्हालाही अन्नधान्य किट आणि मिठाई देतांना झाला. या गृपच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम राबवून आता पर्यंत शाळेत लागणारे अनेक शालेय साहीत्य वाटप, विद्यार्थ्यांना फुड्स पाँकीट वाटप, हिवाळ्यात  गरिबांना मोफत ब्लँकेट वाटप, पावसाळ्यात वृध्दांना छत्री वाटप, अबोल पशुंना चारा छावण्या, वृध्दाश्रम, अनाथाश्रमात कुठल्याही प्रकारचे साहाय्य करणे, उन्हाळ्यात झाडांना पाण्याची कमतरता पडते म्हणून वृक्षावल्ली फाऊंडेशनला पाईप देऊन त्यांना सहकार्य करणे, असे एक ना अनेक कामे सेवा गृपच्या साहाय्याने ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना साहाय्य करणे, थोडक्यात सांगायचे झाले तर ज्यांना जे काही अन्न,वस्र आणि निवारा या अशा प्रकारे एक ना अनेक कामे सेवा गृपच्या माध्यमातून कुठलाही गाजा-वाजा न करता गेल्या चार वर्षापासून अविरत सेवा करण्यात येत आहे. तसेच या महिण्यात दिवाळीचे मुहूर्त साधून ज्यांना दोन वेळेला जेवणाची कमतरता आहे अशा 30 गरजू कुटूंबांना रेशनकीट आणि मिठाई बाँक्स वाटप करुन  गरजूंच्या चेह-यावरचा आनंद बघून आम्हालाही आनंद झाला. 
       असा आमचा सेवा गृप गेल्या चार वर्षापासून अविरत जनसामान्याची सेवा करत असून आता पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहोत. यासाठी आमचे सेवा गृपचे सदस्य वीर संघवी, युवराज सैंदाणे, गणेश राजकोर,दिशा,केसर,मिनाली,प्रणिता आदिंनी सहकार्य करून दर महिण्याला सेवा देत आहोत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..