पाचोरा विधानसभा मतदार संघ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांनी बजावला मतदानाचा हक्क

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
१८- पाचोरा विधानसभा मतदार संघ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांनी बजावला मतदानाचा हक्क

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर दिनांक-20/11/2024 रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकामी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना आपले मतदानाचे हक्क बजाविता यावे याकरीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत महाराष्ट्र कृषी उदयोग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा या ठिकाणी टपाली मतदान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे

18- पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत दिनांक-17/11/2024, 18/11/2024 व दि.19/11/2024 रोजी या तिनही दिवशी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत टपाली मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे. सदर वेळेत निवडणुकामी नियुक्ती केलेल्या विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना टपाली मतदान करता येणार आहे.

त्या अनुषंगाने टपाली मतदानाचा पहिल्याच दिवशी म्हणजेच दिनांक-17/11/2024 रोजी महाराष्ट्र कृषी उदयोग विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, पाचोरा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या टपाली मतदान कक्षात जावुन श्री.धनजंय येरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांचेसह 64 पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला तसेच इतर मतदारांनी देखिल आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन श्री. धनजंय वेरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांनी केले.

सदरची प्रेस नोट उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांचे मान्यतेने देण्यात येत आहे.

ठिकाण :- पाचोरा,

दिनांक:- 17/11/2024

(भूषण अहिरे)

निवडणूक निर्णय अधिकारी,

18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा

उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा

2024+++.docx

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..