लोहारा येथे फॅमिली हेल्थ कार्ड सभासद नोदणी शिबिराला प्रतिसाद..समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने माणुसकी रुग्णसेवा समूह व छत्रपती शाहू महाराज संस्था यांचा स्तुत्य उपक्रम
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
लोहारा तालुका पाचोरा येथे मजूर शेतकरी गरुड नागरिकांना फॅमिली कार्डचे सभासद नोंदणी शिबीर माणुसकी रुग्ण सेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आले. शिबिराचा 250 सभासदांनी लाभ घेतला. फॅमिली हेल्थ कार्डमुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलामध्ये 20 ते 50 टक्के पर्यंत सभासदांना सूट मिळणार आहे त्यात ओपीडी,सोनोग्राफी,रक्त तपासणी,अतीदक्षता उपचार आधी समाविष्ट केले आहे.. माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष गरिबांचे सिंघम म्हणून ओळख असलेले तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोहारा येथे शिबिर लावण्यात आल्याचे छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्प अधिकारी आकाश एस आर के यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती पूजनाने झाली यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व ज्येष्ठ नागरिक प्रभाकर चौधरी, आ.आ.पटेल , विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल चे संचालक डॉ.सागर गरुड, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ केयूर चौधरी, कडू चौधरी, गोपाल पाटील, अमोल पाटील, सचिन पाटील, गजानन शिवदे,अशोक पालीवाल,राजू गीते, गुणवंत सरोदे,अक्षय देशमुख,सीताराम वाणी,सुपेश वाणी,राहुल शिवदे व माणुसकी ग्रुप सदस्य हजर होते.
Comments
Post a Comment