देवगाव (रं) जिल्हा परिषद गटात भाजपाचा प्रचार रणसंग्राम; डॉ. संजय गव्हाणेंच्या नेतृत्वाखाली ‘कमळ’ फुलणारच!


राजेंद्र खैरनार  मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल 

देवगाव (रं) | प्रतिनिधी
देवगाव (रं) जिल्हा परिषद गट क्रमांक २० मध्ये येत्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराची जोरदार आणि नियोजनबद्ध सुरुवात होत असून, मंगळवार दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी डॉ. संजय जगन्नाथ गव्हाणे यांच्या प्रचार शुभारंभाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा विश्वास घेऊन भाजपाने या गटात निवडणूक रणशिंग फुंकले आहे.
सकाळी ९ ते १२ या वेळेत ढवळेश्वर संस्थान, देभेगाव  येथे प्रचार शुभारंभ व प्रचार फेरी, तर दुपारी ४ ते ८ या वेळेत देवनाळात व्यापक प्रचार फेरी आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार मोहिमेत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
डॉ. संजय गव्हाणे हे सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कामांचा ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात असून, देवगाव (रं) गटाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, रोजगार, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “जनतेच्या विश्वासावरच विकासाची पायाभरणी होते” या भूमिकेतून त्यांची वाटचाल सुरू आहे.
या निवडणुकीत भाजपाकडून सौ. माया ललित सुरवसे व विजय संताराम हारडे हे अधिकृत उमेदवार असून, तिन्ही उमेदवारांचा प्रचारात एकसंघ आणि प्रभावी सहभाग दिसून येत आहे. पक्षाचे संघटनबळ, कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासाचा ठोस अजेंडा यामुळे देवगाव (रे) गटात भाजपाला मोठे यश मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
गुरुवार, दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
नागरिकांनी “कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून डॉ. संजय गडताणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..