लोकशाहीच्या बळकटीसाठी पाचोऱ्यात मतदार दिन साजरा; शपथ, स्पर्धा व BLO सन्मानाने कार्यक्रमाला वैचारिक उंची

राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा येथील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय पाचोरा व पाचोरा विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाही मूल्यांचे जनजागरण करणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, राज्यपाल नियुक्त विद्यापरिषद सदस्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे सिनेट सदस्य मा. डॉ. शिरीष पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे, मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी (व्हा. चेअरमन, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था व सिनेट सदस्य), मा. श्री. रणजीत पाटील (नायब तहसीलदार, निवडणूक विभाग) उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य मा. डॉ. जे. व्ही. पाटील, तांत्रिक सहाय्यक श्री. जयंत जाधव व निवडणूक लिपिक श्री. उमेश वाडेकर यांचीही उपस्थिती होती.
सकाळी १२ वाजता डॉ. के. एस. इंगळे (राज्यशास्त्र विभागप्रमुख) यांनी उपस्थित मतदार व विद्यार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली. कार्यक्रमांतर्गत “भारतीय लोकशाहीत मतदारांची भूमिका” या विषयावर निबंध स्पर्धा तसेच “मतदार जनजागृती” या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी संवाद साधताना मा. श्री. भूषण अहिरे साहेब यांनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे स्पष्ट केले. नवमतदारांना आवाहन करत मतदानाचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत नेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात मा. डॉ. शिरीष पाटील यांनी मताचे मूल्य आणि लोकशाहीतील जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले.
रांगोळी स्पर्धेतील विजेते
प्रथम – कु. पोर्णिमा नाना शिंपी (TYBA)
द्वितीय – कु. जान्हवी सुरेश देहडे (TYBSc)
तृतीय – कु. चारुलता भागवत चौधरी (FYBA)
उत्तेजनार्थ – कु. वैष्णवी विजय भोई (FYBA)
उत्तेजनार्थ – कु. गायत्री नाना शिंपी (SYBA)
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या BLO चा सन्मान
पाचोरा तालुका
श्री. अजय जगन्नाथ सोन्नी
(यादी भाग क्र. १३१, नगरदेवळा – ९६.९५%)
श्री. विलास पुंडलिक अमृतकर
(यादी भाग क्र. १२३, पिंपरी बु. – ९१.८७%)
भडगाव तालुका
श्री. महेश सुरेश पाटील
(यादी भाग क्र. ४, पेंडगाव – ८०.१९%)
श्री. समाधान आनंदा पाटील
(यादी भाग क्र. ७५, निंभोरा – ७९.८९%)
कार्यक्रमास डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. शारदा शिरोळे यांच्यासह प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. बी. तडवी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद