पाचोरा नगरपरिषद आपल्या दारी’ मोहिमेने प्रशासनाची कार्यक्षमता रस्त्यावर; प्रभाग ३ पासून स्वच्छतेला गती, तक्रार निवारणाला धार

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल

पाचोरा प्रतिनिधी 
पाचोरा नगरपरिषद आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम केवळ घोषणापुरता न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या माध्यमातून आज शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी प्रभाग क्रमांक ३ पासून पहाटे पासुन प्रभावीपणे सुरू करण्यात आला. स्वच्छता, नागरी आरोग्य आणि नागरिकांच्या तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियान पंधरवाडा व तक्रार निवारण मोहिमेमुळे प्रशासन थेट नागरिकांच्या दारात पोहोचल्याचे चित्र दिसून आले.
या अभियानाच्या प्रारंभी मा. नगराध्यक्ष सौ. सुनीता किशोर आप्पा पाटील, उपनगराध्यक्ष श्री. किशोर गुणवंत बारवकर, नगरपालिका मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी श्री. दुर्गेश सोनवणे, मराठे साहेब, आरोग्य सभापती तथा नगरसेवक श्री. सतिश आबा चेडे, भाजप नगरसेवकपती श्री. विनोद पाटील, स्वीकृत नगरसेवक ॲड. अविनाश सुतार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अभियानांतर्गत परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, गटारी, पथदिवे व नागरी सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कृष्णापुरी परिसरातील दीर्घकाळापासून जाम झालेल्या गटारींची फायर फायटर गाडीच्या उच्च दाबाच्या पाण्याच्या (प्रेशर) सहाय्याने सखोल स्वच्छता करण्यात आली. साचलेला गाळ व कचरा बाहेर काढून गटारी मोकळ्या करण्यात आल्याने परिसरातील दुर्गंधी, पाणी साचणे व आरोग्याच्या समस्या तात्काळ कमी झाल्या असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आरोग्य निरीक्षक श्री तुषार नकवाल इलेक्ट्रिक  विभागाचे योगेश रेवेकर सह नगरपालिकेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी साफसफाई कर्मचारी व मुकरदम गायकवाड सह सर्व उपस्थित होते  प्रसंगी विद्युतविषयक तक्रारींची नोंद घेण्यात आली. तसेच काही ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी केवळ ऐकून न घेता त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रशासनाचा ठाम दृष्टिकोन यावेळी स्पष्ट झाला. नवनिर्वाचित पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनिता ताई पाटील यांनी आरोग्य सभापती सह सर्वांना सूचना दिल्या मागे जे झालं ते विसरा आता यापुढे सर्वाऔनी मोठ्या जोमाने कामाला लागा सर्व साफसफाई सर्व भागातले साफसफाई समस्या निवारण व्हायलाच पाहिजेल अशी सूचना सर्वांना दिली,
“नागरिकांच्या समस्यांवर जागेवरच उपाय” या भूमिकेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम म्हणजे पारदर्शक, उत्तरदायी व कार्यक्षम प्रशासनाचा विश्वासार्ह नमुना ठरत असून, आगामी काळात हा उपक्रम शहरातील सर्व प्रभागांमध्ये राबवून स्वच्छ व सुव्यवस्थित शहर घडविण्याचा संकल्प प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद