कामातूनच नेतृत्वाची ओळख! पाचोरा–भडगावमध्ये विकासाची चाके वेगात; पाचोरा शहरातील प्रभाग १ व ९ मध्ये नगरपालिकेच्या कामांना सुरुवात

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल 
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा नगरपालिकेमार्फत शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांना गती मिळत आहे. पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा,सौ.सुनिताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर, प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक सुमित दादा पाटील, नगरसेविका सौ.दिपाली किशोर पाटील यांच्या सक्रिय पुढाकारातून प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ९ मध्ये नियोजित कामांची सुरुवात अत्यंत नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने करण्यात आली आहे.
या कामांमध्ये पायाभूत सुविधा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता, निचरा व नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित विकासकामांचा समावेश असून, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी मराठे तसेच अभियंता व कर्मचारी वर्ग, ईलेक्ट्रिक विभागाचे योगेश रेवेकर,प्रत्यक्ष मैदानात उतरून कामांवर लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे कामांचा दर्जा, वेळेत पूर्तता आणि पारदर्शकता याबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
विशेषतः पंपिंग रोड, साई पार्क परिसरातील रहिवासी या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत असून, लोकप्रतिनिधी व नगरपालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार व कौतुक करत आहेत. केवळ आश्वासनांपुरते न राहता प्रत्यक्ष कामातून विकास दिसत असल्याने, पाचोरा शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व कर्मचारी यांचा समन्वय म्हणजेच खरे सुशासन असल्याचे हे उदाहरण ठरत असून, आगामी काळातही अशाच पद्धतीने कामे राबविली जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद