मानसिक आरोग्यावर राजकीय-सामाजिक जाणीव : आकाशवाणीच्या ‘स्पंदन’मधून सकारात्मक ऊर्जेचा संदेश


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल

जळगाव | प्रतिनिधी
सध्याच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना, आकाशवाणी जळगावच्या “स्पंदन” या विशेष कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा, मानसिक संतुलन व तणावमुक्त जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमात रेकी आचार्य व प्राध्यापिका जयश्री वाघ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राजकीय धावपळ, सामाजिक स्पर्धा व सततचा तणाव याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. शासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था यांनी केवळ भौतिक विकास नव्हे तर मानसिक आरोग्यालाही प्राधान्य देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राजकीय निर्णय, निवडणुकीचे ताणतणाव, बेरोजगारी व महागाईसारख्या प्रश्नांमुळे समाजात वाढत असलेली अस्वस्थता कमी करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी व आत्मिक संतुलन आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिक घडल्याशिवाय लोकशाही बळकट होऊ शकत नाही, असा सूचक संदेश या मुलाखतीतून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सादरीकरण विजय भुयार यांनी प्रभावीपणे केले. “स्पंदन” हा कार्यक्रम सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी जळगाव केंद्रावर 102.1 एफएम तसेच NewsOnAir मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
राजकारणाच्या गदारोळात दुर्लक्षित ठरणाऱ्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर आकाशवाणीने घेतलेली ही पुढाकारात्मक भूमिका नागरिकांसाठी दिशादर्शक ठरणारी आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..